Sameer Amunekar
म्हशीच्या दुधात कॅल्शियम प्रमाण जास्त असते, त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. गाईच्या दुधात कॅल्शियम थोडं कमी असते पण शरीरास सहज पचते.
म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि फॅट जास्त असल्यामुळे ऊर्जा जास्त मिळते, शरीराला ताकद आणि स्टॅमिना वाढवते. गाईचे दूध कमी फॅट असले तरी हलकं असल्याने पचनास सोपे आहे.
गाईचे दूध हलके आणि पचायला सोपे असते. म्हशीचे दूध जड आणि फॅटयुक्त असल्यामुळे काही लोकांना पचायला अवघड वाटू शकते.
म्हशीच्या दुधात आयरन प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला रक्त वाढवण्यास मदत होते. गाईच्या दुधात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे एनर्जी प्रोसेसिंग सुधारते.
म्हशीचे दूध जास्त फॅट असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त. गाईचे दूध कमी फॅट असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चांगले.
गाईच्या दुधातील सॅचुरेटेड फॅट कमी असल्यामुळे हृदयासाठी जास्त सुरक्षित. म्हशीच्या दुधातील फॅट जास्त असल्यामुळे हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणातच घेणे चांगले.
ऊर्जा आणि वजन वाढवण्यासाठी म्हशीचे दूध उत्तम. हलके, पचायला सोपे आणि हृदयासाठी सुरक्षित गाईचे दूध उत्तम.