Rahul sadolikar
'गदर 2'मुळे चर्चेत असणारी अमीषा सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे
रांची येथील एका दिवाणी न्यायालयाने गुरुवारी अमीषा आणि तिचा व्यवसाय भागीदार कुणाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी केले आहे.
तक्रार दाखल करणारा अजय कुमार सिंग हा झारखंडचा चित्रपट निर्माता आहे
रांची जिल्ह्यातील हरमू येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी अभिनेत्री अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता
त्याने चित्रपटाच्या मेकिंग आणि प्रमोशनसाठी अमीषाच्या बँक खात्यात २.५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. फिर्यादीनुसार, 2013 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, मात्र अद्याप चित्रपट पूर्ण झालेला नाही.
वारंवार उशीर केल्यावर अमिषाने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला अडीच कोटी आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, जे बाऊन्स झाले.
तिच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 420 आणि 120 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.