Akshata Chhatre
कोथिंबीर
केवळ स्वयंपाकाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नाही, तर कोथिंबीर आता सौंदर्य जगतात एक 'रॉकस्टार' म्हणून ओळखली जात आहे.
ताजी कोथिंबीर व्हिटॅमिन-सी, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे ती त्वचा आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
त्वचेच्या अनेक समस्या जसे की तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, पिंपल्स आणि काळे डाग यावर कोथिंबीर प्रभावी उपाय आहे.
कोथिंबीर रक्तक्षय थांबवण्यास मदत करते, जे निस्तेज त्वचेचे मुख्य कारण आहे.
कोथिंबिरीमुळे त्वचेवरील डाग कमी होतात आणि रंगत सुधारते.
इतकंच नव्हे तर, कोथिंबीर आणि लेमन ग्रासचा लेप पिंपल्ससाठी, तर कोथिंबीर आणि टोमॅटो फेसपॅक त्वचेची चमक वाढवण्यासाठी उपयोगी आहे.
याशिवाय, कोथिंबीर आणि लिंबूचा रस ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. केसांतील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी कोथिंबीर आणि मध डोक्याच्या त्वचेवर लावणे प्रभावी ठरते.