Sameer Amunekar
कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. नारळ तेलात पाने उकळून थंड झाल्यावर टाळूवर लावल्याने खाज कमी होण्यास मदत होते.
टी ट्री ऑईलमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करणारे घटक आहेत. नारळ तेलात २-३ थेंब मिसळून टाळूवर लावावे.
शुद्ध कोरफड जेल थेट टाळूवर लावल्यास थंडी देतो व खाज कमी करतो. यामुळे जळजळ आणि खाज दोन्हीपासून आराम मिळतो.
दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे डेंड्रफ आणि स्किन इरिटेशनवर परिणामकारक असतात. दही टाळूवर २०-३० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.
लिंबात असलेले अँटीसेप्टिक घटक टाळूवरील खाज कमी करतात. लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून टाळूवर लावा आणि काही वेळाने धुवा.
हळदीत अँटीसेप्टिक व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळद व थोडे दूध मिक्स करून टाळूवर लावल्यास खाज कमी होते.
धूळ, घाम व तेल यामुळे बॅक्टेरिया वाढतो व खाज होते. त्यामुळे केस दररोज स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. सौम्य हर्बल शॅम्पूचा वापर करा.