दैनिक गोमन्तक
कॅल्शियम हे शरीरासाठी खूप आवश्यनक खनिज आहे. हाडे तयार करणे आणि निरोगी ठेवण्यासाठी स्नायु आकुंचन, हृदयाचे ठोके वाढण्यास त्याची मदत होते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोका असामान्य होतो.
सांधेदुखीचा त्रास सुरु होतो, सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे न्युरोलॉजिकल समस्या निर्माण होतात.
झोपेचा त्रास, स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखांवर छोटे ठिपके होतात. नख वारंवार तुटण्यास सुरुवात होते.
त्वचा कोरडी पडते, एक्झिमा नावाचा त्वचारोग होऊ शकतो.
शरीरात कॅल्शियम कमी असल्याने रात्री पायाला पेटके येतात.