Akshata Chhatre
जर तुम्ही रोज सकाळी ताजी कॉफी बनवत असाल, तर वापरलेले कॉफी ग्राऊंड्स किंवा शिल्लक राहिलेली ब्लॅक कॉफी फेकून देण्याची चूक करू नका!
तुम्हाला जाग आणणारे कॅफीन आता तुमच्या केसांच्या मुळांना सक्रिय करू शकते.
कॉफी कॅफीन, अँटिऑक्सिडंट्स आणि प्लांट कंपोनंट्सने परिपूर्ण असल्याने केसांची वाढ सुधारते आणि गळणे कमी करते, तसेच DHT ला प्रतिबंधित करते.
केसांच्या समस्यांनुसार कॉफी वापरण्याच्या तीन सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत.
कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी, कॉफीमध्ये दही, नारळाचे दूध आणि मध मिसळून डीप कंडिशनिंग मास्क बनवा.
गळणाऱ्या आणि पातळ केसांसाठी, कॉफीमध्ये कांद्याचा रस आणि एरंडेल तेल मिसळून स्कॅल्प ट्रिटमेंट करा.
वारंवार स्टाइलिंग प्रोडक्ट्स वापरणाऱ्यांसाठी, कॉफी ग्राऊंड्समध्ये नारळ/ऑलिव्ह तेल मिसळून स्कॅल्प स्क्रब बनवा. यामुळे मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल निघून जाते,