Akshata Chhatre
ऋतू बदलला की फक्त हवामान नाही, तर आपल्या त्वचेतही मोठे बदल दिसतात. हिवाळ्यात कोरडी होणारी त्वचा उन्हाळ्यात तेलकट होते, तर काहींना अचानक पिंपल्स, टॅनिंग किंवा पिग्मेंटेशनचा त्रास होतो.
अशा वेळी महागडी स्किनकेअर प्रॉडक्ट्स, पार्लरमधले फेशियल्स उपयोगी पडत नाहीत आणि कधी कधी उलट त्वचेचं नुकसानच करतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक कॉफी ट्रिक खूप लोकप्रिय होत आहे.
फक्त चमचा कॉफी पावडर, अर्धा कप पाणी, १ चमचा कॉर्न स्टार्च, १ चमचा कोरफड जेल आणि २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या
पाणी आणि कॉफी पावडर ३–४ मिनिटं उकळवून गाळा, त्यात कॉर्न स्टार्च मिसळून पुन्हा गरम करत घट्ट होईपर्यंत शिजवा, मग त्यात कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई घालून नीट मिसळा.
हे मिश्रण थंड झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा; यामुळे त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो, टॅनिंग कमी होतं, पिंपल्सचे डाग हलके होतात आणि चेहरा मऊ, फ्रेश व तजेलदार दिसतो.
कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतून टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि सौम्य मसाजमुळे रक्ताभिसरण वाढून त्वचेला पोषण मिळतं; त्यामुळे थकलेला चेहरा हळूहळू तजेलदार होतो.