Akshata Chhatre
केस गळण्याची समस्या आजच्या काळात खूपच सामान्य झाली आहे. वय, वातावरण, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.
महागडी रसायने आणि उत्पादने वापरूनही कायमस्वरूपी परिणाम मिळत नाही. पण, या समस्येचं उत्तर आपल्या स्वयंपाकघरात दडलेलं आहे तो म्हणजे नारळ तेल.
नारळ तेलामध्ये नैसर्गिक फॅटी ऍसिड्स असतात, जे टाळूपर्यंत सहज पोहोचून केसांना आतून पोषण देतात, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.
तेलातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा आणि इतर बुरशीजन्य समस्या कमी करतात. केसांमध्ये नैसर्गिक चमक आणण्याची क्षमता यात असल्याने केस घनदाट व निरोगी दिसतात.
नारळ तेलासोबत खालील घटक मिसळून एक प्रभावी केसवर्धक तेल तयार करता येते. हे घटक केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत; कांदा, आलं, कढीपत्ता, मेथीदाणे, ताजं कोरफड जेल.
एका मोठ्या भांड्यात नारळ तेल हलकं गरम करावं,त्यात वरील सर्व घटक टाकून मंद आचेवर शिजवावे. घटक जळून तेलाचा रंग काळसर झाल्यावर गॅस बंद करावा. तेल थंड झाल्यावर ते गाळून एका काचेच्या डब्यात साठवावे. हे तेल काही महिन्यांपर्यंत टिकतं.
केस धुण्याआधी एक ते दोन तास हे तेल मुळांपासून केसांच्या टोकांपर्यंत नीट लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. मसाजमुळे रक्ताभिसरण वाढतं आणि तेलातील पोषकद्रव्ये मुळांपर्यंत पोहोचतात. अधिक चांगल्या परिणामांसाठी रात्री झोपण्यापूर्वी तेल लावून ठेवले तरी चालते.