Akshay Nirmale
देशातील 70 हजार नागरीकांनी नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरीकत्व स्विकारले. यात 40 टक्क्याहून अधिक गोव्यातील नागरीक आहेत.
भारताचे नागरिकत्व सोडणाऱ्या बहुतांश गोवेकरांनी परदेशात चांगल्या रोजगारासाठी नागरिकत्व सोडले आहे.
उपलब्ध माहितीनुसार गतवर्षी 1265 गोवावासीयांनी भारतीय नागरीकत्व सोडून पोर्तुगीज नागरीकत्व स्विकारले.
पोर्तुगीज पासपोर्टमुळे जगभरातील सुमारे 180 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येते. त्यामुळेही पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्याकडे गोवावासीयांचा कल आहे.
पोर्तुगीज पासपोर्टमुळे 180 देशांमध्ये विना कटकट प्रवास करता येतो.
गोव्यातील काही नागरीकांनी इतर काही राष्ट्रांप्रमाणे दुहेरी नागरीकत्व देण्याचा विचार केंद्र सरकारने करावा, असेही म्हटले आहे.
गोव्यावर साडेचारशे वर्षे पोर्तुगीज अंमल होता. त्यातून पोर्तुगालशी गोव्याचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. हे कनेक्शही या नागरीकत्व बदलामागे आहे.