Kavya Powar
नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने किनारी भागांत होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी खंडपीठाने सरकारला कठोर निर्देश दिले आहेत.
त्यानुसार प्रशासनाकडून संगीत वाजविण्यासाठी रात्रीची १० ही वेळमर्यादा नक्की करण्यात आली आहे
मात्र तरीही या वेळेचे पालन सध्या होत नसल्याचे चित्र आहे
या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची किनारी भागात गर्दी दिसून येते.
वेळेत संगीत बंद केल्यास पर्यटकांचा हिरमोड होतो. तसेच 'हे गोवा आहे, एवढ्या लवकर पार्टी बंद नाही होत', असा जणू त्यांचा पक्का समजच झाला आहे
सध्या खुलेआम जाहिराती सुरू असून, पार्टीसाठी दिलेल्या वेळेचे नियम मोडले जात असल्याचे दिसून येते
वागातोर, बागा किनारी भागात २३ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत रात्री पार्ट्या चालणार,त्यावर रात्री ८ ते पहाटे ६.३० या वेळेत कार्यक्रम सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे