दैनिक गोमन्तक
गोव्यासह देशभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
अशा प्रकारे पारंपारिक पद्धतीने येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस चर्चमध्ये साजरा केला जात आहे.
केरळ, भोपाळ, दिल्ली सगळीकडे नाताळाची जोरदार तयारी मागील काही दिवसांपासून सुरु होती.
ओडिशा गोपालपूर येथे एक कलाकाराने 1500 किलोचा सांता टोमॅटोमधून साकारला आहे.
ही सुंदर कलाकृती गोपालपुरच्या समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आली.
शिमल्यामध्ये नाताळनिमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली.
नाताळाला सर्वत्र नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळत आहे.
गोव्यात येशू जन्माचे स्वागत करण्यासाठी गोठा सजविण्यात आला आहे.
पणजीत अनेक ठिकाणी चर्चचा परिसर नेत्रदीपक रोषणाईने उजळला आहे.
मॉल्स, बाजारपेठा नाताळासाठी सजल्या आहेत.
चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.