दैनिक गोमन्तक
कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या नाताळ सणाचा मोठा उत्साह संपूर्ण गोव्यात पाहायला मिळत आहे.
यशू जन्मानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मध्यरात्री चर्चमध्ये मास पार पडले.
पणजी, ओल्ड गोवा, मडगाव, म्हापसा, कळंगुटसह विविध ठिकाणी विविधरंगी रोषणाई केली आहे.
ठिकठिकाणी मॉल्स, हॉटेल्स, बाजारपेठा सजल्या असून, नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळत आहे.
पणजी येथील मेरी 'मेरी इमॅक्युलेट' चर्चमध्ये नागरिकांनी माससाठी मोठी गर्दी केली.
येशू जन्माचे स्वागत करण्यासाठी गोठा सजविण्यात आला आहे.
चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गोवा नाताळनिमित्त नेत्रदीपक रोषणाईने उजळला आहे.
अशाप्रकारे संपूर्ण गोव्यात नाताळाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.