Manish Jadhav
छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर बसल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच केलेली बुऱ्हाणपूरची स्वारी ही मुघल सत्तेचा पाया हादरवून टाकणारी एक ऐतिहासिक घटना होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघल बादशाह औरंगजेबाला वाटले होते की स्वराज्य कमकुवत झाले आहे; हे चुकीचे ठरवण्यासाठी आणि मुघलांना जरब बसवण्यासाठी संभाजी महाराजांनी ही धाडसी मोहीम आखली.
बुऱ्हाणपूर हे दक्षिण भारतातील मुघलांचे सर्वात श्रीमंत शहर आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र होते, जेथे मुघलांची मोठी रसद आणि संपत्ती साठवलेली असे.
जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांनी अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने या मोहिमेचे नियोजन केले.
मराठ्यांचे सैन्य इतक्या वेगाने बुऱ्हाणपूरच्या वेशीवर पोहोचले की, तेथील मुघल सुभेदार खानजहान बहादूर याला सावरायला अजिबात वेळ मिळाला नाही.
मराठ्यांनी सलग तीन दिवस बुऱ्हाणपूरमधील मुघलांच्या 17 पेक्षा जास्त पेठांवर हल्ला करुन अफाट संपत्ती, सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तू स्वराज्यात आणल्या.
या स्वारीत मराठ्यांनी केवळ लूटच केली नाही, तर बुऱ्हाणपूरच्या संरक्षणासाठी असलेल्या मुघल सैन्याचा दारुण पराभव केला.
या विजयामुळे औरंगजेबाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याला स्वतः दख्खनमध्ये उतरण्यास भाग पाडले, ज्यामुळे पुढील 27 वर्षांच्या संघर्षाची ठिणगी पडली.