Akshata Chhatre
छावा चित्रपटातील शेवटच्या भागात कवी कलश- छत्रपती संभाजी महाराजांमधील संवाद पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.
'नमक नहीं तुम चन्दन हो कवि, तुम तिलक हो हमारे माथे का। असं संभाजी महाराज कवी कलश यांना सांगतात.
तुम्हाला माहितीये का कवी कलश यांनी संभाजी महाराजांसाठी पोर्तुगीजांशी तहासाठी चर्चा देखील केली होती.
पोर्तुगीज- मराठा संबंध या पुस्तकात कवी कलश यांच्या गोवा तहावरील चर्चेचा संदर्भ आहे.
एकीकडे औरंगजेबचा मुलगा शाहआलम आणि दुसरीकडे पोर्तुगीज अशा दोन्ही आघाड्यांवर लढणे अशक्य होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीजांशी तह करण्यास तयार झाले.
या तहाच्या वाटाघाटी भीमगडच्या पायध्याशी 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 1684 मध्ये झाल्या होत्या.
पोर्तुगीजांनी आंजेदिव बेट खाली करणे, एक लक्ष होनांचा नजराणा देणे या दोन अटींवरून तह अपूर्ण राहिला होता.
तुम्हाला युद्ध जाहीर कऱण्याचा अधिकार देण्यात आलाय का? असा प्रश्न कवी कलश यांनी पोर्तुगीजांना विचारला होता.