CSK vs GT: गुजरातविरुद्ध ऋतू'राज'

Pranali Kodre

चेन्नईचा विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत 23 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला.

Chennai Super Kings | www.iplt20.com

चेन्नई फायनलमध्ये

या विजयासह एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे.

MS Dhoni | Ravindra Jadeja | www.iplt20.com

ऋतुराजची फिफ्टी

या सामन्यात चेन्नईच्या विजयात ऋतुराज गायकवाडने मोठा वाटा उचलला. त्याने 44 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावांची खेळी केली.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com

सामनावीर

ऋतुराजच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com

चौथी फिफ्टी

दरम्यान, ऋतुराजचे गुजरातविरुद्ध आयपीएलमधील चौथे अर्धशतक ठरले.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com

गुजरातविरुद्ध ऋतू'राज'

विशेष म्हणजे चेन्नईने गुजरातविरुद्ध आत्तापर्यंत चारच सामने खेळले आहे. या चारही सामन्यात ऋतुराज खेळला असून त्याने अर्धशतके केली आहेत.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com

IPL 2022 मधील फिफ्टी

ऋतुराजने यापूर्वी 2022 आयपीएल हंगामात पुण्याला आणि मुंबईला गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये अनुक्रमे 73 आणि 53 धावांची खेळी केली होती.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com

IPL 2023 ची दणक्यात सुरुवात

त्यानंतर आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात गुजरातविरुद्ध खेळताना ऋतुराजने अहमदाबादला 92 धावांची खेळी केली होती.

Ruturaj Gaikwad | www.iplt20.com
CSK | Dainik Gomantak