Shreya Dewalkar
प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते.
पायदळ हासुद्धा मराठ्यांच्या सैन्याचा महत्त्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला मुख्य स्थान प्राप्त झाले होते.
पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष दिले.
पायदळात दहा माणसांचा दाहिजा असे व हवालदार, जुमलेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत, सर्वांत लहान तुकडी 10 सैनिकांची असे.
पायदळाचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशी लढण्याचे असे.
येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात गोव्यात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून धारातीर्थी पडले.
पायदळाचे सरनौबत येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या ८ दिवसांच्या लढाईमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना वेळेत फोंडा गाठता आले
म्हणून गोव्याचा फोंडा किल्ला सुरक्षित राहिला.