दैनिक गोमन्तक
हवामान बदल व त्याच्या परिणाम जगभर दिसून येत आहे.
आता त्याचा परिणाम समुद्रावरदेखील झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या दोन दशकांत जगातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 56 टक्के महासागरांचा रंग बदलला आहे, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) व इतर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले आहे.
विषुववृत्ताजवळील प्रदेशात हा रंग हळूहळू हिरवा झाला असून महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून सूचित होते. महासागराच्या वरील भागात असलेल्या फायटोप्लँक्टन या वनस्पतीसारख्या सूक्ष्मजीवांत असलेल्या क्लोरोफिल या हिरव्या रंगद्रव्यांमुळे सागराला हिरवा रंग येतो
मानवी डोळ्यांसाठी समुद्राच्या रंगातील हा बदल सूक्ष्म असल्याने तो साध्या डोळ्यांनी ओळखणे शक्य नाही