Kavya Powar
इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 ने घेतलेल्या चंद्राच्या प्रतिमांचा एक नवीन व्हिडिओ जारी केला.
चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या एक दिवस आधी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मंगळवारी सांगितले की, लॅंडर चंद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे.
लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेले लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ उतरणे अपेक्षित आहे.
19 ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेच्या 'लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा' (NPDC) ने सुमारे 70 किमी उंचीवरुन घेतलेली चंद्राची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.
इस्रोने सोमवारी 'लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड एव्हिडन्स कॅमेरा' (LHDAC) मधून घेतलेली चंद्राच्या दूरच्या बाजूची छायाचित्रे प्रसिद्ध केली.
अहमदाबादस्थित 'स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर' (SAC) ने विकसित केलेला हा कॅमेरा सुरक्षित 'लँडिंग' क्षेत्र शोधण्यात मदत करतो, जिथे खडक किंवा खोल खंदक नाहीत. SAC हे इस्रोचे मुख्य संशोधन आणि विकास केंद्र आहे.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लँडरमध्ये LHDAC सारखी प्रगत टेक्नॉलॉजी आहे. चांद्रयान-2 अयशस्वी झाल्यानंतर 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात आले.