Akshata Chhatre
प्रेमाच्या आंधळेपणात हरवलेल्या तरुण मुली अनेकदा भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घेतात, विशेषतः विवाहासारख्या आयुष्यभराच्या निर्णयात.
आजच्या काळात नाती रूप आणि भावना यावर आधारलेली असली तरी त्यात पुढे जाऊन तणाव, दुरावा आणि अविश्वास निर्माण होतो.
म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी चाणक्यांनी दिलेले काही मूलभूत, शाश्वत आणि आजही लागू होणारे सल्ले लक्षात घेणे गरजेचे आहे.
चाणक्य नीती सांगते की जोडीदार निवडताना फक्त देखणेपणा, पैसा किंवा हुद्दा पाहू नये; तर स्वभाव, विचार, कुटुंबातील वागणूक, आर्थिक शिस्त, जबाबदारी, संकटात वागण्याची पद्धत आणि पत्नीला दिला जाणारा आदर यांचा खोल अभ्यास आवश्यक आहे.
चाणक्यानुसार रूप क्षणिक असते, पण स्वभाव आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे संयमी, समजूतदार आणि सहनशील स्वभावाचा पुरुषच खरा जीवनसाथी ठरतो.
जो आपल्या कुटुंबाचा आदर करतो, महिलांना सन्मान देतो, त्याच्याकडूनच पत्नीला देखील मान-सन्मान मिळतो. फक्त सध्या पैसा आहे म्हणून जोडीदार निवडणे चुकीचे ठरू शकते.
म्हणून तरुण मुलींनी लग्नाचा निर्णय केवळ भावनेच्या आधारे न घेता, चाणक्य नीतीनुसार विचारपूर्वक, स्वाभिमानाने आणि प्रगल्भ बुद्धीने घ्यावा.