Akshata Chhatre
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये कर्म आणि धर्म या तत्त्वज्ञानाला केंद्रीय स्थान दिले आहे. त्यांच्या मते, मनुष्याचा खरा धर्मच त्याचे कर्म करत राहणे आहे.
चाणक्य नीतीतील महत्त्वाचे सूत्र आहे की, 'भाग्यवन्तमपरीक्ष्यकारिणं श्री: परित्यजति।'
चाणक्यांच्या मते, यशाची संधी ओळखल्याविना सोडून जाते. अशा व्यक्तीला यश मिळत नाही आणि तो लक्ष्मी रहित राहतो.
एखादी व्यक्ती स्वतःला कितीही भाग्यवान समजत असली, तरी त्याने वेळेला ओळखले नाही, तर त्याचे भाग्य व्यर्थ ठरते.
कोणतंही काम करण्याआधी, त्या कार्याचा भविष्यात काय परिणाम होईल किंवा त्याला काय संधी आहेत, याचा नीट तपास करणे अत्यंत आवश्यक आहे.
चाणक्य सांगतात की, फक्त कर्म करणे पुरेसे नाही, तर विचारपूर्वक कर्म करणे महत्त्वाचे आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा कार्य सुरू करताना, घाई न करता परिस्थितीचा अभ्यास करा. संधी ओळखा. परिणामांचा अंदाज घ्या.
जो व्यक्ती हे परीक्षण न करता फक्त नशिबावर अवलंबून राहतो, त्याला लक्ष्मी साथ देत नाही.