Shreya Dewalkar
खरं तर चांद्रयानाचे पृथ्वीवरील उड्डाणच आव्हानात्मक गोष्ट होती.
कारण प्रक्षेपकाने चांद्रयानाला योग्य कक्षेत सोडले नसते तर मोहीम तेथेच फसली असती.
दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पृथ्वीपासून झेपावलेले चांद्रयान चंद्राच्या कक्षेत स्थिर होणे.
जर गणिते चुकली असती तर चांद्रयान अवकाशात भरकटले असते.
त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रपोल्शन मॉड्यूल मधून विक्रम लॅंडर विलग करणे.
कारण अनेक दिवसांच्या अवकाशातील प्रवासामुळे यांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात
आणि सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे आजचे विक्रमचे लॅंडींग, ज्यात सर्वच देशवासीयांनी आमची साथ दिली.