गोव्यातील 'या' तुरूंगात जायला पर्यटक का उत्सुक असतात?

Akshay Nirmale

म्युझियम

गोव्यातील आग्वाद हा तुरूंग एकेकाळी गोवा मुक्ती संग्रामाचे केंद्र बनला होता. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना या तुरूंगात डांबले गेले होते. आता या तुरूंगाचे रूपांतर गोवा सरकारने म्युझियम मध्ये केले आहे.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

इतिहास

या वस्तू संग्रहालयात गोवा मुक्ती संग्रामातील राम मनोहर लोहिया, डॉ. त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा यांसह अन्य स्वातंत्र्यसेनानींशी संबंधित वस्तू, आठवणी, शस्त्रे जतन केली आहेत.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

तिकीट दर

सध्या हा तुरूंग पर्यटकांना पाहण्यासाठी नियमित खुला असतो. गोव्यातील नागरिकांना येथे प्रतीव्यक्ती 100 रूपये तिकीट आहे तर गोव्याबाहेरील नागरिकांसाठी प्रतीव्यक्ती 200 रूपये तिकीट आहे.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे

येथील तुरूंग पाहता येतो. तुरूंगात काही सेलमध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी कैद्यांचे पुतळे उभारले आहेत.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

घंटीपासून कलाकृती

येथील अनेक कलाकृती पर्यटकांचे मन मोहून घेणाऱ्या आहेत. घंटी पासून बनवलेला बैल आणि घर आकर्षक आहेत.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

पेंटिंग्ज प्रदर्शन

येथे एक कायमस्वरूपी पेंटिंग्ज प्रदर्शनदेखील सुरू आहे. यातील अनेक कलाकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak

पर्यटकांचे आकर्षण

गोव्यातील आग्वाद कारागृह हे आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आग्वाद किल्ला पाहायला येणारे पर्यटक या जेलमध्येही येतात.

Aguada Jail, Goa | Dainik Gomantak
Waterfalls in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...