दैनिक गोमन्तक
या वर्षी भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारीला जगाचा निरोप घेतला. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले होते.
कथ्थक नृत्य प्रकाराचे पितामह पंडित बिरजु महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 16 जानेवारीला निधन झाले.
संगीतप्रेमींना सिंगर केकेच्या निधनाने धक्का बसला. केकेचा कोलकत्ता येथे कार्यक्रम चालु असताना हार्ट अटॅकने मृत्यु झाला.
पंजाबी सिंगर सिद्धु मुसावाला याची 29 मेला हत्या झाली.
बॉलिवुडचा लोकप्रिय आवाज बप्पी लेहरी यांचे 15 फेब्रुवरीला मुंबईत निधन झाले. बप्पीदांनी हिंदीसह बंगाली, तेलगु, कन्नड चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत.
हार्ट अटॅक आल्यानंतर महिनाभर मृत्युशी झुंज देणाऱ्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले.
टिव्ही अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी याचा जीममध्ये वर्कआऊट करत असताना हार्ट अटॅकने मृत्यु झाला.
टिव्ही अभिनेते अरुण बाली यांनी पण याच वर्षी जगाचा निरोप घेतला.
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पण 26 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अभिनय, नाट्य क्षेत्रातील विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त झाली.
अनेक वर्ष नाटक, अभिनय क्षेत्रात काम करणारे हरहुन्नरी कलावंत प्रदिप पटवर्धन यांचेही 2022मध्ये निधन झाले.