Akshay Nirmale
देशातील आघाडीची IT कंपनी HCL Technologies चे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत.
EdelGive Hurun India Philanthropy List 2023 नुसार शिव नाडर यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 2042 कोटी रुपये देणगी दिली. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 76 टक्के अधिक आहे.
2022-23 आर्थिक वर्षात त्यांनी दररोज सरासरी 5.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
1976 मध्ये त्यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीची स्थापना केली. 1980 मध्ये, कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात IT हार्डवेअर विकण्यास सुरुवात केली. एचसीएल ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने देशी संगणक तयार केले.
व्यवसायाने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या शिव नाडर यांनी 1967 मध्ये वालचंद ग्रुपमध्ये नोकरी केली. एचसीएलच्या आधी त्यांनी मायक्रोकॉम्प नावाची कंपनी स्थापन केली जी कॅल्क्युलेटर बनवते.
शिव नाडर यांनी 4 दशकांहून अधिक काळ एचसीएलचे नेतृत्व केले. आता कंपनीची धुरा त्यांची मुलगी रोशनी नाडर-मल्होत्रा सांभाळते. नाडर कुटुंबाची एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये 60 टक्के भागीदारी आहे.
शिव नाडर यांनी 1994 मध्ये शिव नाडर फाउंडेशन सुरू केले. या माध्यमातून ते सामाजिक काम करत असतात. 1996 मध्ये त्यांनी चेन्नईत अभियांत्रिकी कॉलेज काढले.