Akshay Nirmale
पणजीतील इमारतींवर ठिकठिकाणी मोठमोठी चित्रे पाहायला मिळतात.
कदंबा बस स्थानकपासून ते पणजी मार्केट परिसरात आणि इतरही ठिकाणी ही जायंट वॉल पेंटिंग्ज दिसून येतात.
सुमारे 30 फुटांपासून ते 70 फुटांपर्यंत या पेंटिंग्जचा आकार आहे.
मोठ्या आकारांमुळे लांबूनच ही चित्रे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
पणजीत दरवर्षी भरणाऱ्या सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलवेळी इमारतींवर ही चित्रे काढली जातात.
या चित्रकलेतून पणजीची सांस्कृतिक ओळखही समोर येते.
पणजीतील विविध मंदिरे, फाँटेनाज या भागासह ही पेंटिग्जदेखील पर्यटकांची आकर्षण ठरली आहेत.