Rahul sadolikar
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. बौद्ध धर्म त्याच्या अनुयायांना जगाला आणि स्वतःला सखोल आणि परिवर्तनशील मार्गाने समजून घेण्यास सांगतो.
बौद्ध धर्मात वेगवेगळ्या प्रकारे ध्यानाचा वापर करतात. तिबेटी परंपरेत, ध्यानकर्ते एक मंत्र वापरतात जे त्यांचे मन केंद्रित करण्यात मदत करते.
ध्यान करताना तुम्हाला आरामदायक वाटले पाहिजे त्यासाठी तुम्ही उशी किंवा खुर्चीही वापरू शकता. मोकळा श्वास घेता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुमच्या शरीरात आणि बाहेर जाणाऱ्या हवेच्या संवेदनांवर तुमचे लक्ष केंद्रित करा. जसजसे तुम्ही अधिक केंद्रित व्हाल तसतसशी तुमची ध्यानातली एकाग्रता वाढेल.
तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या शरीरावर आणि मनाकडे लक्ष द्या. याच गोष्टी तुमच्यात परिवर्तन घडवून आणू शकतात हे समजून घ्या.
ध्यानामुळे जी एक शारीरिक प्रतिक्रिया मिळते ती हृदयाची गती कमी करते, रक्तदाब कमी करते आणि तणाव संप्रेरकांची पातळी कमी करते."
ध्यान तुम्हाला शिकवते की जग नश्वर आहे. प्रत्येक गोष्ट संपणार आहे. थोडक्यात बुद्धांनी सांगितलेले अंतीम सत्य म्हणजेच मृत्यू आणि त्याआधीचे आयुष्य यापलीकडची अवस्था म्हणजे ध्यान..