Kavya Powar
भावा-बहिणीच्या अतूट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण लवकर येत आहे.
या रक्षाबंधन काहीतरी वेगळ पण तुमच्या बजेटमध्ये बसणारं गिफ्ट तुमच्या भावाला द्या आणि नात्याचा गोडवा वाढवा
मुलांना गॅजेट्स खूप आवडतात. तुम्ही 500-1000 मध्ये येणारे ब्लूटुथ हेडफोन गिफ्ट करू शकता
आजकाल प्रत्येकजण जिमला जातो. जर तुमचाही भाऊ जात असेल तर त्याला जिमसाठी लागणारी एखादी गोष्ट गिफ्ट करा आणि मग त्याचा आनंद बघा
अक्षरश: चिंध्या झाल्या तरी मुलं आपलं वॉलेट बदलत नाहीत, असं तुमच्याही भावाच्या बाबतीत असेल तर एखादं क्लासी बजेट फ्रेंडली वॉलेट तुम्ही भावाला देऊ शकता
गिफ्टमध्ये भावाला उपयोगी पडेल अशी वस्तू द्यायची तर शेविंग किट हा एक चांगला पर्याय असू शकतो
स्वस्तात मस्त गिफ्टमध्ये तुम्ही सुंदर कॉफी मग भावाला गिफ्ट म्हणून देऊ शकता
जर तुमच्या भावाला पुस्तक वाचण्याची आवड असेल तर मग त्याच्या आवडत्या लेखकांची पुस्तकं हे त्याच्यासाठी एक अविस्मरणीय गिफ्ट ठरू शकतं