Kavya Powar
ब्रोकोली ही अशी एक भाजी आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळतात.
यामुळेच प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारात या भाजीचा समावेश करावा. आरोग्य तज्ज्ञही ही ब्रोकोली रोज खाण्याचा सल्ला देतात.
पौष्टिकतेने समृद्ध ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
पण जर तुम्ही तुमच्या दैनंदिन संतुलित आहारात ब्रोकोलीचा समावेश केला तर शरीरात आवश्यक घटकांच्या कमतरतेची समस्या होण्याची शक्यता कमी असते.
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात
ब्रोकोली खाल्ल्याने हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.
त्यात व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते. व्हिटॅमिन के चयापचयसाठी आवश्यक आहे.