गोमन्तक डिजिटल टीम
बॉलिवूडमधील कुटुंबाच्या यादीत पहिला नंबर लागतो ते कपूर परिवराचा.
कपूर आणि सिनेमा हे एक समीकरणच बनलं आहे. पृथ्वीराज कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत, सोनम आणि रियाच्या स्टाईलबद्दल जगभरात चर्चा आहे.
बच्चन कुटुंबाचा स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत दुसरा नंबर लागतो. ते नेहमीच बेस्ट कपडे परिधान केलेल्या कुटुंबांच्या यादीत येतात. अमिताभ बच्चन यांची स्टाईल सगळा भारत फॉलो करताना दिसतो. त्यांच्या दाढीची स्टाईल असेल किंवा त्यांच्या चालण्याची स्टाईल तरूणांना आजही भुरळ घालते.
ऋषी कपूर यांचं व्ही गळ्याची स्वेटर स्टाईल आजही तरूणांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.
अनिल कपूर आणि बोनी कपूर कुटुंब या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. श्रीदेवी यांची स्टाईल तर काही औरचं होती.
पटोदी कुटुंबाची सून करीना कपूरच्या स्टाईल आणि फॅशनचे कौतुक करेल तेवढ कमी आहे. याशिवाय या कुटुंबातील सर्वात तरुण सदस्य, तैमूरची शैलीही नेहमीच चर्चेत असते.
पटोदी कुटुंब जन्मजात नवाब सैफ अली खानला ही शैली वारशाने मिळाली आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पटोदी हे अतिशय उत्तम ड्रेसर होते. सैफच्या याच नवाबी अंदाजवर करीना कपूर फिदा आहे.