दैनिक गोमन्तक
मुंबईत 1944 साली जन्मलेल्या तबस्सुम यांचे वडिल अयोध्यानाथ हे सैनिक होते, तर त्यांच्या आई असगरी बेगम पत्रकार आणि लेखिका होत्या.
तबस्सुम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली.
तबस्सुम यांनी 1947 मध्ये आलेल्या "नर्गिस" या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाला सुरुवात केली होती.
भारतीय टेलिव्हिजनचा पहिला टॉक शो ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ होस्ट करुन तबस्सुम यांना खरी ओळख मिळाली.
त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
तबस्सुम यांनी मुघल-ए-आझमपासून अनेक मोठे चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तबस्सुम यांनी सरगम, संग्राम, दीदार आणि बैजू बावरा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
1985 मध्ये आलेल्या "तुम पर हम कुर्बान" या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
त्यांचा शेवटचा चित्रपट राजेश खन्ना आणि गोविंदा यांचा "स्वर्ग" चित्रपटात त्यांनी शेवटचे काम होते.
प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचा हृदय विकाराचा झटक्याने वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे.
अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.