गोमन्तक डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) मुंबईतील जुहू येथील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
अभिनेत्रीच्या घरात चोरी झाल्याचे आणि काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकरणी तपास पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
शिल्पा शेट्टीच्या हाऊसकीपिंग मॅनेजरने पोलिसांना चोरीची माहिती दिली होती.
हाऊसकीपिंग मॅनेजरने तक्रारीत म्हटले आहे की, "मे महिन्याच्या अखेरीस बंगल्यात काही नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. त्याचवेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबीयांसह परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती
तेव्हा बंगल्यातील हॉल, डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूममधील सामान अस्थाव्यस्थ पडल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर शिल्पा शेट्टी यांच्या मुलीच्या बेडरूममधील वॉर्डरोबही उघडे होते
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी केली. तेव्हा बंगल्याच्या आवारात मास्क घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीला स्लाइडिंग खिडकी उघडून बेडरूममध्ये प्रवेश करून वस्तू चोरत असल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.
70 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आहेत. तपासानंतर शहरातील विलेपार्ले परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.