गोमंतक ऑनलाईन टीम
बॉलीवूड-टॉलीवूड
अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हीने बॉलीवूडसह टॉलिवूडमध्येही काम केले आहे.
रकुल तिच्या लुक्समुळे नेहमी चर्चेत असते. आताही ती तिच्या साडीतील नव्या लूकमुळेच चर्चेत आली आहे.
रकुलला भारतीय पोशाख परिधान करणे आवडते. तिच्या कडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे.
वेस्टर्न असो की देशी कपडे रकुल प्रत्येक लूक उत्तम कॅरी करते.
रकुलने साडीवर परिधान केलेल्या ब्लाऊजच्या चर्चाही बी टाऊनमध्ये होत असतात. सेसी, डीप नेक, बॅकलेस, सिल्व्हर वर्क असे तिने वापरलेले प्रकार चर्चेत आहेत.
रकुल सध्या अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रकुलची एकूण संपत्ती 45 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.
आगामी काळात रकुल आयलान या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. यात शिवकार्तिकेयन मुख्य भूमिकेत असणार आहे.