गोमन्तक डिजिटल टीम
बॉलीवूड अभिनेत्री, उत्कृष्ट नृत्यांगणा मलायका अरोरा सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.
मलायकाने गोव्यात केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मिडियावरुन शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असणारी मलायका पाठिमागे होणाऱ्या सूर्यास्तात खुलून दिसत आहे.
पाठीमागे समुद्र आणि अस्ताला निघालेला सूर्य यामुळे नभाला आलेली लाली फोटोच्या सौंदर्यात भर घालत आहे.
मलायका आरोरा अर्जुन कपूर सोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेनंतर काही काळासाठी लाईमलाईटपासून दूर गेली होती.
दरम्यान, पुन्हा एकदा मलायका तिच्या बिन्दास्त आणि स्टाईलिश आवतारात परताना दिसत आहे.