Pramod Yadav
मलायका अरोरा नेहमीच गोव्यात येत असते, फ्री टाईम असो की शुटींग मलायकासाठी गोवा हॉट डेस्टिनेशन राहिला आहे.
मलायकाने नुकतेच गोव्यात नव्याने झालेल्या एका रेस्टॉरंटमध्ये फॅमिली डिनर केला.
आसगाव येथे नव्याने झालेल्या बावरी या रेस्टॉरंटमध्ये मयालकाने स्वादिष्ट भारतीय जेवणावर ताव मारला.
शेफ अमनिंदर संधूने गोव्यातील आसगाव येथे बावरी रेस्टॉरंट सुरु केले आहे.
मलायकासोबत यावेळी तिचे कुटुंबीय आणि बहीण अमृता अरोरा देखील उपस्थित होती.
अमनिंदर संधू एक नामांकित शेफ असून, ऑगस्टमध्ये गोव्यातील आसगाव येथे तिने नव्याने रेस्टॉरंट सुरु केले.
अनेक नामांकित लोक आसगावमधील बावरी रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हजेरी लावत असतात.