Akshay Nirmale
निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची ज्येष्ठ कन्या जान्हवी कपूर हीने कमी कालावधीत बॉलीवुडमध्ये स्वतःचे बस्तान बसवले आहे.
जान्हवीची मोठी फॅन फॉलोविंग तयार झाली आहे. तिला इन्स्टाग्रामवर २ कोटी १७ लाख फॉलोअर्स आहेत.
सध्या जान्हवीचा बवाल हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर पाहता येऊ शकतो.
तथापि, जान्हवी सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. शिखर पहाडिया हा जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड असल्याची चर्चा आहे. शिखर आणि जान्हवी हे बालपणीपासूनचे मित्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण एकत्रित झाले आहे.
सध्या बी टाऊनमध्ये कोणतीही पार्टी असली की तिथे जान्हवी शिखरसोबत दिसते. दोघांची एकमेकांशी अगदी घट्ट फ्रेंडशिप दिसून येते.
शिखर हा पोलो खेळाडू तसेच उद्योजक आहे. त्याने 2018 मध्ये मनोरंजन आणि गेमिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याआधी तो लंडनस्थित एका फर्ममध्ये गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम करत होता.
जान्हवी आणि शिखर यांनी तिरुपती बालाजी मंदिरातही एकत्र भेट दिली होती. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती पहाडिया यांचा शिखर हा मुलगा आहे.