दैनिक गोमन्तक
बॉलिवुडचा हॅन्डसम हिरो, कॉमेडी किंग गोविंदा आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याची हटके लव्हस्टोरी जाणून घेऊया.
सुनिता यांच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामाशी लग्न झाले होते. त्याच मामाकडे गोविंदा रहायचा. तिथे त्यांची ओळख झाली.
दोघांची पर्सनॅलिटी एकदम विरुध्द होती, त्यांची खूप भांडणं व्हायची.
पण डान्सची आवड हा दोघांमधील कॉमन फॅक्टर होता. पुढे त्यांच्यात प्रेम खुलले.
त्यांनी एकमेकांना लव्ह लेटर्स लिहिली, घरच्यांनी 11 मार्च 1987ला दोघांचं लग्न लावून दिलं.
त्यांना 1मुलगा आणि 1 मुलगी आहे. असा एकदम आनंदी संसार गोविंदाचा आहे.
लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला त्यांनी परत एकमेकांसोबत लग्न केले.
आपल्या प्रेमासोबत प्रमाणिक राहणाऱ्या गोविंदाचे कुटुंब प्रेम बॉलिवुडमध्ये सर्वांना माहित आहे.