Akshay Nirmale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 1 ऑक्टोबर रोजी गोव्यातील मिरामार बीचवर एक तास स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व अभिनेता अर्जुन रामपालने (Arjun Rampal) केले. त्याच्यासोबत निर्माता-अभिनेता राहुल मित्रा देखील उपस्थित होता.
गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रोटरी क्लब आणि एल शादाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयकर विभागाचे प्रधान संचालक (तपास), पणजी यांनी ही मोहिम आयोजित केली होती.
या स्वच्छता उपक्रमात निसर्गप्रेमी, शाळकरी मुले आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अर्जून रामपाल म्हणाला की, भावी पिढ्यांसाठी हा ग्रह स्वच्छ सोडून जाणे ही आपली जबाबदारी आहे..
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार एक तास चांगला व्यतीत केला. मिरामार किनाऱ्यावर सगळ्यांनीच छान काम केले. आशा आहे देशातील प्रत्येकजण योगदान देईल, असे अर्जून म्हणाला.
पाऊस असूनही या विशेष उपक्रमात सहभागी झालेल्या लहान मुलांचे राहुल मित्रा याने कौतुक केले.