Sameer Amunekar
उकडलेल्या अंड्यात तेल, मसाले नसल्याने कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते उत्तम पर्याय.
उकडलेल्या आणि फ्राय अंड्यांतील प्रोटीन शरीरात सारखेच शोषले जाते, पण उकडलेले अंडे हलके असल्याने ते लवकर पचते.
फ्राय अंड्यात तेल किंवा बटर वापरल्याने सॅच्युरेटेड फॅट्स वाढतात; उकडलेले अंडे हृदयासाठी अधिक सुरक्षित.
उकडल्यावर बहुतेक पोषक घटक टिकतात, तर जास्त तापमानात फ्राय केल्यास काही व्हिटॅमिन्स (जसे की व्हिटॅमिन D, B12) कमी होऊ शकतात.
उकडलेले अंडे साधे व हलके असल्याने पचनाला सोपे जाते, तर मसालेदार फ्राय अंडे पचायला जड पडू शकते.
जिम करणाऱ्यांसाठी उकडलेले अंडे उत्तम प्रोटीन स्रोत आहे; तर टेस्टसाठी व चव वाढवण्यासाठी अधूनमधून फ्राय अंडे चालते.
डॉक्टर व न्यूट्रिशनिस्ट दररोज नाश्त्यात २ उकडलेली अंडी घेण्याचा सल्ला देतात; फ्राय अंडी मर्यादित प्रमाणात खाणे योग्य.