Akshata Chhatre
आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण शरीरात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या बदलांकडे दुर्लक्ष करतो.
सामान्य वाटणाऱ्या या लक्षणांमागे गंभीर आजार दडलेले असू शकतात.काही सुरुवातीच्या लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून वेळेत निदान आणि उपचार शक्य होतील.
रात्री झोपेत अनपेक्षितपणे खूप घाम येणे किंवा वारंवार ताप येणे हे केवळ हवामानातील बदलांचे लक्षण नाही
काही आठवड्यांत किंवा महिन्यांत अचानक वजन कमी होणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
अंगात शक्तीच नसल्यासारखे जाणवणे किंवा थोडे चालल्यानंतरही श्वास लागणे ही गंभीर लक्षणे आहेत.
जर तुम्हाला बराच काळ हाडात किंवा पाठीच्या कण्यात सतत वेदना होत असतील, तर त्याला सामान्य दुखणे समजू नका.
नाकातून किंवा हिरड्यांतून रक्त येणे, सहज जखमा होणे आणि त्या बऱ्या होण्यास जास्त वेळ लागणे ही लक्षणे प्लेटलेट्स कमी झाल्याचे दर्शवतात.