Kavya Powar
भारतात बहुतेक लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. काही लोकांसाठी, चहा हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा आवश्यक भाग असतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की, चहामध्ये मीठ टाकल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.
काही प्रकारच्या चहामध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात, जसे. त्यामुळे आपली चयापचय शक्ती वाढते.
जर ग्रीन टी पिण्याचे शौकीन असाल तर त्यामध्ये काळ्या मीठाचा अवश्य समावेश करा. कारण ग्रीन टीमध्ये काळे मीठ टाकल्याने त्याचे पाचक गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स वाढण्यास खूप मदत होते.
लेमन टीमध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
काळ्या चहामध्ये काळे मीठ टाकल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. वास्तविक, काळे मीठ पोटातील पाचक एन्झाईम्सला चालना देण्याचे काम करते.
त्यामुळे अन्न लवकर पचते आणि चरबीही कमी होते.