Akshay Nirmale
बी टाऊनमधील अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेत्रा करनसिंग ग्रोव्हर हे कपल सध्या त्यांचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.
सुरवातीला डेटिंग आणि नंतल लग्नबंधनात अडकलेल्या या कपलच्या जीवनात गतवर्षी 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीचा जन्म झाला.
दरम्यान, बिपाशा-करनच्या मुलीच्या हृदयाला जन्मल्यापासूनच दोन छिद्रे होती.
मुलीचा जन्म झाला तेव्हा तिला व्हेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट असल्याचे बिपाशाला माहिती नव्हते. त्यामुळे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता.
त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर अवघ्या ३ महिन्यातच तिच्या हृदयावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती.
बिपाशा म्हणते शस्त्रक्रियेचा निर्णय खूप अवघड होता कारण, हृदयाच्या दोन छिद्रांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल 6 तासांचा कालावधी लागला.
शस्त्रक्रियेनंतर सध्या बिपाशा-करनच्या मुलीला कसलाही धोका नाही. बिपाशा-करनच्या मुलीचे नाव देवी असे आहे.