Puja Bonkile
शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज आणि उद्या (04 आणि 05 मे) गोव्यातील बाणावली येथे होत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत.
आज सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी गोव्यात येण्यापूर्वी भुत्तो यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील SCO बैठकीसाठी गोव्यात असून आज सकाळी त्यांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली
भारतासाठी SCO अध्यक्षपदासाठी दिलेल्या पाठिंब्याचे यावेळी जयशंकर यांनी कौतुक केले.
चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग देखील गोव्यात दाखल झाले आहे.