Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला तब्बल 309 धावांनी पराभूत केले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मिळवलेला हा विजय वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.
वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.
भारताने 15 जानेवारी 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.
वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत 26 जून 2023 हरारेला झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अमेरिकेला तब्बल 304 धावांनी पराभूत केले. हा वनडे क्रिकेट इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे.
दरम्यान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे हे तीनच संघ असे आहेत, ज्यांनी 300 पेक्षा अधिक धावांनी वनडेत विजय मिळवला आहे.
वनडेत सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याच्या यादीत न्यूझीलंडचा चौथा क्रमांक येतो. त्यांनी 1 जुलै 2008 रोजी आयर्लंडविरुद्ध 290 धावांनी विजय मिळवला होता.
या यादीत पाचव्या क्रमांकावर देखील ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने 4 मार्च 2015 रोजी झालेल्या वनडेत अफगाणिस्तानविरुद्ध 275 धावांनी विजय मिळवला होता.
या विक्रमाच्या यादीत सहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांनी 22 ऑक्टोबर 2010 रोजी झालेल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 272 धावांनी विजय मिळवला होता.