Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 19 मार्च रोजी विशाखापट्टणमला झालेल्या वनडेत 234 राखून पराभूत केले होते.
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये चेंडूंच्या तुलनेत मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी 2019 मध्ये हेमिल्टनला झालेल्या वनडेत 212 चेंडू राखून भारताविरुद्ध विजय मिळवला होता.
तसेच 2010 मध्ये डंबुल्लामध्ये झालेल्या वनडेत श्रीलंकेने भारताला 209 चेंडू राखून पराभूत केले होते.
आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन संघांनाच वनडेत भारताविरुद्ध 200 पेक्षा जास्त चेंडू राखून विजय मिळवता आला आहे.
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये चेंडूंच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरही श्रीलंकाच आहे.
श्रीलंकेने 2012 मध्ये हंबांटोटा येथे झालेल्या वनडेत भारताला 181 धावांनी पराभूत केले होते.
तसेच श्रीलंकेने 2017 मध्ये धरमशाला येथे झालेल्या वनडेत भारताला 176 धावांनी पराभूत केले होते.