Pramod Yadav
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने अभिनयासह आता हॉटेल व्यवसायातही उडी घेतली आहे.
भूमीने गोव्यात नवे ब्युटीक आणि रेस्टॉरंट सुरू केले आहे.
Chrome Asia Hospitality च्या सोबत भूमीने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
‘KAIA’ म्हणजे ‘प्युअर लाईफ’ असे नाव भूमीने तिच्या हॉटेलला दिले आहे.
भूमी पेडणेकर मूळ पेडणे तालुक्यातील असल्याने तिने येथेच हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्युटीक, हॉटेल आणि रेस्टॉरंटचा असा हा प्रकल्प आहे असे भूमीने म्हटले आहे.
भूमीने गोव्यातून एक फोटो पोस्ट केला असून, मनाने अजून ती गोव्यात असल्याचे म्हटले आहे.