गोमन्तक डिजिटल टीम
विड्याच्या पानामुळे तोंडातील लाळेचे प्रमाण वाढते.
मुखदुर्गंधीचा नाश होतो.
‘रुची सौगंध वर्धनार्थ’ असे त्यामुळे चरकसंहितेत म्हटले आहे. तोंडातील चिकटपणा कमी होतो. अन्न पचण्यास मदत होते. पर्यायाने बलवर्धनही होते
. ही पाने रुमामस्तगी, सुपारी आणि कात यांच्यासह एकत्र करून दातदुखीवरचे उत्तम औषध तयार करता येते.
ही पाने काही प्रमाणात कामवासना उत्तेजकसुद्धा आहेत
कृमिनाशक असल्यामुळे ‘ओरल हायजिन’ पानामुळे वाढतो. तुरट चवीमुळे दातांचे हिरड्यांची मजबुती वाढते.
तीन-चार पाने टाकली, तर तुपाला अतिशय सुंदर चव येते. शिवाय तूप अधिक रवाळ होते. अलीकडे चॉकलेट, वेगवेगळे माऊथ फ्रेशनर यापासून केले जातात. अगदी आईस्क्रीमही बनवले जाते.