शाकाहारी माणसांना मिळेल भरपूर प्रोटीन; फक्त 'हे' खाल्लं पाहिजे

Akshata Chhatre

प्रोटीन

आपल्या शरीरातील हाडं, त्वचा, स्नायू, केस, नखं आणि अनेक पेशींच्या पोषणासाठी आणि पुनर्निर्मितीसाठी प्रोटीन अत्यावश्यक असतं.

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

चिकन किंवा मासे

अनेक लोकांना वाटतं की प्रोटीन मिळवण्यासाठी अंडी, चिकन किंवा मासे खाणं गरजेचं आहे, पण हे पूर्णपणे खरं नाही.

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

शाकाहारी पदार्थ

शाकाहारी व्यक्तींनाही असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत जे प्रोटीनच्या बाबतीत मांसाहारी पदार्थांपेक्षा कमी नाहीत. उदाहरणार्थ, क्विनोआ हे असं धान्य आहे ज्यात सर्व आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

प्रोटीन आणि फायबर

एका कप पातळ क्विनोआमध्ये सुमारे ८ ग्रॅम प्रोटीन आणि ५ ग्रॅम फायबर मिळतं. हे लवकर शिजतं, पचायला हलकं असतं आणि पोहे, उपमा किंवा सूपमध्ये सहज वापरता येतं.

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

सोया पनीर

टोफू म्हणजेच सोया पनीर हा आणखी एक उत्तम पर्याय आहे; एक कप टोफूमध्ये १० ते १५ ग्रॅमपर्यंत प्रोटीन असतं आणि यामध्ये आयर्न, कॅल्शियम व मॅग्नेशियमही आढळतात.

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

आयर्न आणि फोलेट

राजमा, चणे, काळे हरभरे, मसूर आणि मूग या बीन्स आणि डाळी प्रोटीनने परिपूर्ण असून अर्धा कप पातळ उकडलेल्या बीन्समध्ये ७–९ ग्रॅम प्रोटीन मिळतं, तसेच फायबर, आयर्न आणि फोलेटही मिळतात.

plant protein|protein supplement | Dainik Gomantak

पावसाळ्यात येणारे किडे ठरतात त्रासदायक? कडुलिंब करेल 'छूमंतर'

आणखी बघा