Summer Diet: गर्मीच्या दिवसांत स्ट्राँग राहण्यासाठी आहारात 'या' पानांचा समावेश करा

Manish Jadhav

उन्हाळा

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचनसंस्था मजबूत ठेवणारे आहाराचे पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. काही पाने आणि पालेभाज्या पचनसंस्थेस मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषण पुरवतात. आपल्या डाएटमध्ये ही पाने समाविष्ट करावीत.

Summer | Dainik Gomantak

पुदिना (Mint)

तुम्ही उन्हाळ्यात पुदीनाचे सेवन केले पाहिजे. पुदिनाच्या सेवनाने पचनसंस्था सुधारते. तसेच, शरीराला थंडावा देखील मिळतो. याशिवाय, तुम्ही पुदिनाचा रस किंवा चटणी बनवून सेवन करु शकता.

Mint and hot water | Dainik Gomantak

कोथिंबीर (Coriander Leaves)

कोथिंबीर शरीरातील उष्णता कमी करुन पचनास मदत करते. कोथिंबीर फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे.

coriander | Dainik Gomantak

तुळस (Holy Basil)

उन्हाळ्यात तुम्ही दररोज तुळशीची पाने खाल्ली पाहिजेत. तुळशीच्या पानांचे दररोज सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे इम्युनिटी वाढते. तुळशीच्या पानांचा काढा किंवा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

basil leaves | Dainik Gomantak

कढीपत्ता (Curry Leaves)

कढीपत्ता पचनतंत्र सुधारते आणि जड अन्न पचण्यास मदत करते. कढीपत्ता पचनाच्या तक्रारी कमी करुन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो. उन्हाळ्यात तुम्ही कढीपत्त्याचे दररोज सेवन केले पाहिजे.

Curry Leaves Benefits | Dainik Gomantak

पालक (Spinach)

पालकमध्ये फायबर आणि पचनास मदत करणारे भरपूर पोषक तत्त्वे आहेत. पालक शरीराला थंडावा देते. तुम्ही सूप, पराठा, भाजी किंवा सॅलडमध्ये पालक समाविष्ट करु शकता.

Spinach Water | Dainik Gomantak
आणखी बघा