Sameer Amunekar
तिळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E भरपूर असतात. हृदयासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. विशेषतः थंड हवामानात वापरणे चांगले.
मोहरीच्या तेलात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसेच हे तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते.
यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. तळण आणि फ्राय पदार्थांसाठी हे तेल योग्य आहे.
यात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात, जे ऊर्जा वाढवतात. पारंपरिक भारतीय स्वयंपाकात याचा वापर पचनासाठी फायदेशीर मानला जातो.
यात व्हिटॅमिन E आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक असतात. हे तेल त्वचेच्या आरोग्यासाठीही चांगले आहे, पण अति वापर टाळावा.
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हे सर्वात हेल्दी तेलांपैकी एक आहे. सॅलड्स, हलका स्वयंपाक किंवा ड्रेसिंगसाठी सर्वोत्तम.
एका प्रकारचे तेल सतत वापरण्याऐवजी, तिळाचे, शेंगदाण्याचे, सूर्यफुलाचे आणि ऑलिव्ह ऑइल यांचा आळीपाळीने वापर करा. त्यामुळे शरीराला विविध पोषक तत्त्वे मिळतात.