वस्तू Recycling करुन वापरल्याचे 'हे' आहेत फायदे

दैनिक गोमन्तक

Global Recycle Day

18 मार्च हा ग्लोबल रिसायकल डे ( Global Recycle Day ) म्हणून साजरा करतात. यानिमित्ताने जाणून घेऊयात, रिसायकलिंगचे काय फायदे आहेत.

Recycle | Dainik Gomantak

नैसर्गिक संसाधनाचे जतन

जेव्हा वस्तू पुन्हा पुन्हा वापरल्या जातात, कमी प्रमाणात वापरल्या जातात आणि त्यावर प्रक्रिया करुन वापरल्या जातात. तेव्हा निसर्गातील खनिजे, झाडे, लाकूड, पाणी अशा अनेक नैसर्गिक संसाधनांचे जतन होण्यास मदत होते.

Recycle | Dainik Gomantak

आर्थिक फायदे

रिड्यूस, रियूज आणि रिसायकल यामुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. याचबरोबर सर्कुलर इकॉनॉमीलादेखील प्रोत्साहन मिळते.

Recycle | Dainik Gomantak

प्रदूषणात घट

जल, वायू, ध्वनी प्रदूषणात आपोआप घट होते. कचरा ज्याठिकाणी टाकला जातो, त्यातून निघणारे विषारी वायू यामध्येदेखील घट होण्यास मदत होते.

Recycle | Dainik Gomantak

पर्यवरणाचे संरक्षण

जेव्हा फेकून दिलेल्या कचऱ्यातून किंवा एकदा वापरुन झालेल्या वस्तूंवर पुन्हा प्रक्रिया करुन नवीन उपयोगी वस्तू बनवली जाते, अशावेळी वातावरणात सोडले जाणारे हरित गृह वायूचे प्रमाण कमी होते.

Recycle | Dainik Gomantak

ऊर्जा संवर्धन

वस्तूंच्या रिसायकलिंगमुळे ऊर्जेचेदेखील मोठ्या प्रमाणात संवर्धन होते.

Recycle | Dainik Gomantak